कर्नाळा बँक घोटाळा : 76 जणांवर गुन्हा दाखल

रायगड जिल्ह्यातील कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी एकूण ७६ जणांवर गुन्हा दाखल करणयात आला आहे. नवी मुंबई पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले आहे.
कर्नाळा बँक घोटाळ्यानंतर राज्य सरकारकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती. यासाठी भाजपच्या वतीने ठेवीदारांचे पैसे परत मिळावे, या मागणीसाठी बँकेच्या मुख्य शाखेवर मोर्चा काढला होता.
यानंतर काल मध्यरात्री 76 जणांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. यामध्ये माजी आमदार आणि बॅंकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्यावर ही गुन्हा दाखल झालाय.
63 जणांच्या खात्यावर बोगस कागदपत्र सादर करून 512 कोटीच्या वर कर्ज काढण्यात आली. बोगस कर्जदार, बोगस जमीनदार दाखवून आपापसात ही कर्ज करण्यात आलीत.
1 हजार कोटींच्या घोटाळ्यानंतर सहकार खाते या घोटाळ्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ठेवीदारांची संघर्ष समिती करीत आहे.तर दोषी संचालकांची मालमत्ता जप्त करावी अशी मागणी भाजप करत आहे.