Mon. May 17th, 2021

पाणी टंचाईने जीव गेल्यास महाराष्ट्र जबाबदार – डी.के. शिवकुमार

महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाचे संकट आहे. मराठावाडा विदर्भ तसेच अख्या महाराष्ट्रात भीषण पाणी टंचाई आहे. या पार्श्वभूमीवर सध्या अनेक दिग्गजांचे दुष्काळ दौरे, बैठका आणि दुष्काळावर मात करण्यासाठीच्या उपाययोजना करण्यासाठीचे नियोजन सुरू आहे. एकिकडे महाराष्ट्रात पाणी टंचाई आहे. तर दुसरीकडे कर्नाटकबरोबर पाणी वाटपाचा प्रश्न चिघळणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कृष्णा नदीच्या काठावरील गावांना दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावत असणारी पाणी समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत परस्पर पाणी वाटप कराराची चर्चा झाली होती. यावर पाणी टंचाईने जीव गेल्यास महाराष्ट्र जबाबदार असे कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री डी के शिवकुमार यांनी म्हटलं आहे.

नेमक प्रकरण काय?

२००४ पासून २०१७ पर्यंत कर्नाटकने महाराष्ट्राकडून पाणी विकत घेतले आहे.

त्यानंतर परस्पर पाणी वाटप करार करून दोन राज्यातील पाणी समस्या साडवू.

संबंधीचे पत्र राज्याच्या मुख्य सचिवांकडून महाराष्ट्र सरकारला पाठविण्यात येईल.

पाणी वाटप करार कसा असावा या संबंधी निर्णय घेण्यासाठी तांत्रिक समिती स्थापन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातून 4 टीएमसी पाणी कर्नाटकाला सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.

बदल्यात अलमट्टी धरणातून जत,सोलापूरला 4 टीएमसी पाणी सोडण्याची मागणी महाराष्ट्राने केली आहे.

आचारसंहितेमुळे हा करार लांबणीवर जात आहे.

महाराष्ट्र ने मोठा भाऊ म्हणून कराराची वाट न पाहता निर्णय घ्यावा असंही शिवकुमार यांनी म्हटलंय.

टंचाईने जीव गेल्यास महाराष्ट्र जबाबदार असेल असंही ते म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *