Fri. Feb 28th, 2020

मराठी भाषिक नगरसेवकांविरुद्ध कारवाईसाठी कर्नाटक सरकार करणार नवा कायदा

जय महाराष्ट्र न्यूज, बेळगाव

 

काळ्या दिनात सहभागी झालेल्या मराठी भाषिक नगरसेवकांविरुद्ध कारवाईसाठी बेळगावातील हिवाळी अधिवेशनात नवीन कायदा बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी याच अधिवेशनात नवीन कायदा बनविण्याचे स्पष्ट संकेत दिलेत. बुधवारी आमदारांच्या बैठकीवेळी एका कानडी वृत्त संस्थेला दिलेल्या माहितीत बेग यांनी राज्य म्युन्सीपल कायद्यात बदल करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून याला सकारात्मक प्रतिसाद मिळालाय अशी माहिती दिलीय.

गेल्या काही महिन्यापूर्वी रोशन बेग यांनी मराठी लोकप्रतिनिधीना जय महाराष्ट्र या घोषणा दिल्यास कारवाई करण्याचे वक्तव्य केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *