Tue. Sep 27th, 2022

बसवराज बोम्मई यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

कर्नाटक: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आज बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बसवराज बोम्मई यांच्या नावावर पक्षानं शिक्कामोर्तब केलं.

बसवराज बोम्मई यांनी आज ११ वाजता मुख्यमंत्री पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी बसवराज बोम्मई यांना शपथ दिली. शपथविधीच्या वेळी माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पासुद्धा उपस्थित होते. बोम्मई हे कर्नाटकचे २३ वे मुख्यमंत्री ठरले आहेत.

बसवराज बोम्मई यांचा राजकीय प्रवास

  • बसवराज बोम्मई मुख्यमंत्रीपदी निवड होण्याआधी कर्नाटकचे विद्यमान गृहमंत्री
  • जनता दलापासून राजकीय कारकिर्द सुरू
  • त्यासोबत त्यांनी कर्नाटक सरकारमध्ये जल व्यवस्थापन, कायदे विभाग, सांस्कृतिक कार्यमंत्रीपद अशी अनेक महत्त्वाची पदं भूषवली
  • बोम्मई यांनी १९९८मध्ये पहिल्यांदा कर्नाटक विधानसभेवर निवडून गेले
  • पुन्हा २००४ मध्ये सलग दुसऱ्यांदा धारवाडमधून मिळवत कर्नाटक विधानसभेत प्रवेश
  • २००८ मध्ये भाजपाचे आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.