Wed. Dec 8th, 2021

बी.एस.येडियुरप्पा यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

कर्नाटक: कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली, तसेच कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांना राजीनामा सोपवला आहे.

गेल्या आठवड्यात येडियुरप्पा यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेटही घेतली होती. २०२३ मध्ये कर्नाटकच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचं सध्याचं वय लक्षात घेत नेतृत्त्वबदल करण्याचा निर्णय भाजपनं घेतला असल्याचं समजत आहे.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून येडियुरप्पा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. भाजपच्या हायकमांडनं त्यांचं वय आणि प्रकृती लक्षात घेता त्यांचा राजीनामा मागितला असल्याचं बोललं जात होतं. अखेर आज त्यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *