Tue. Jun 18th, 2019

कर्नाटक पोटनिवडणूक: भाजपला पिछाडत काँग्रेस-जनता दल सेक्युलरची आघाडी

0Shares

कर्नाटक विधानसभा दोन आणि लोकसभेच्या तीन मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत भाजपाला मागे टाकत काँग्रेस-जनता दल सेक्युलरने आघाडी केली आहे.

लोकसभा निवडणूक जवळ आलेली असताना या पोटनिवडणुकीचे निकाल तिन्ही पक्षांसाठी महत्वाचे ठरणार आहेत.

रामानगरम विधानसभा मतदारसंघ – 

 • जे़डीएस उमेदवार अनिता कुमारस्वामी १ लाख ९ हजार १३७ मतांनी विजयी
 • अनित कुमारस्वामी यांना १ लाख २५ हजार ४३ मते मिळाली
 • तर प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवाराला फक्त १५ हजार ९०६ मते मिळाली.
 • अनिता मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या पत्नी आहेत.

जमाखांदी विधानसभा पोटनिवडणूक – 

 • काँग्रेस उमेदवार आनंद एस नयामगौडा ३९,४८० मताधिक्क्याने विजयी
 • त्यांना ९६ हजार ९६८ मते मिळाली तर भाजपा उमेदवार श्रीकांत कुलकर्णी यांना ५७,४९२ मते मिळाली.

बल्लारी लोकसभा मतदारसंघ –

 • काँग्रेस उमेदवार व्ही.एस.उगरप्पा दीडलाख मतांनी आघाडी

शिवमोगा लोकसभा मतदारसंघ –

 • सहाव्या फेरीअखेर भाजपा उमेदवार आघाडीवर
 • भाजपा उमेदवाराला १लाख ९२ हजार ०९६ मते
 • तर जेडीएस उमेदवाराला १ लाख ७३ हजार ७५५ मते मिळाली आहेत.

मांडया लोकसभा मतदारसंघ –

 • जेडीएस उमेदवार १,१८,३३० मतांनी आघाडीवर आहे.
 • भाजपा उमेदवाराला फक्त ७१ हजार मते मिळाली आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *