Fri. Jul 30th, 2021

बंडखोर आमदारांना मनवायला DK शिवकुमार मुंबईत!

कर्नाटकात सुरू असलेला सत्तासंघर्ष आणखी एका वळणावर पोहोचलाय. मुंबईमध्ये लपलेल्या कर्नाटकातील काँग्रेस आणि JDS च्या बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी कर्नाटकातील काँग्रेसचे मंत्री DK शिवकुमार मुंबईत डेरेदाखल झाले आहेत. पण बंडखोर आमदारांनी मंत्रीमहोदयांना भेटायला नकार दिलाय.

काय घडलं नेमकं?  

काँग्रेस आणि JDSचे बंडखोर आमदार मुंबईतील रेनेसाँ हॉटेलमध्ये आहेत.

या बंडखोर आमदारांचं मन वळवण्यासाठी काँग्रेसचे मंत्री DK शिवकुमार मुंबईला आले.

शिवकुमार या आमदारांना भेटायला हॉटेलमध्येही आले.

मात्र आमदारांनी आपल्याला शिवकुमार यांना भेटायची अजिबात इच्छा नसल्याचं म्हटलंय.

त्यामुळे हॉटेलमध्ये आमदारांना भेटण्यापासून शिवकुमार यांना अडवण्यात आलंय.

या बंडखोर आमदारांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून सुरक्षेची मागणी केली आहे.

आपल्याला शिवकुमार यांची भीती वाटते. आम्हाला त्यांना भेटायची इच्छा नाही, असं या आमदारांनी कळवलं.

आमदारांच्या विनंती सुरक्षा त्यानुसार वाढवण्यात आली आहे.

पोलीस सुरक्षेप्रमाणेच हॉटेलबाहेर SRPF आणि RAF च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

 संबंधित बातमी- काँग्रेस- JDS आमदारांचा ‘तो’ गोवा प्लॅन कॅन्सल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *