Wed. Jul 28th, 2021

कर्नाटक मध्ये राजकीय भूकंप ; मंत्रिमंडळातील काही मंत्री राजीनाम्याच्या तयारीत असल्याची चर्चा

कर्नाटक मंत्रिमंडळातील 9 मंत्री राजीनाम्याच्या तयारीत असून मुख्यमंत्री राजीनामा स्वीकारणार असल्याची चर्चा होत आहे. काँग्रेस आणि जेडीएसच्या 14 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर अपक्ष आमदार नागेश यांनी देखील राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे.

कर्नाटक मंत्रिमंडळातील 9 मंत्री राजीनाम्याच्या तयारीत असून मुख्यमंत्री राजीनामा स्वीकारणार असल्याची चर्चा होत आहे. काँग्रेस आणि जेडीएसच्या 14 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर अपक्ष आमदार नागेश यांनी देखील राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. 12 जुलैपासून कर्नाटक विधिमंडळाच अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष व मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे.

कर्नाटक मध्ये राजकीय भूकंप

कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएसच्या 14 आमदारांनी राजीनामा दिल्याने कुमारस्वामी सरकार अडचणीत होते

त्यातचं भर म्हणून कर्नाटक मंत्रिमंडळातील 9 मंत्री राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.

सत्ताधारी पक्षांतील बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय अजूनपर्यंत निर्णय घेतला नाही.

विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार मंगळवारी बेंगळुरूमध्ये आल्यावर हा निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान सर्व राजीनामे दिलेले आमदार हे मुंबईच्या सोफिटेल हॉटेल मध्ये मुक्कामास आहेत.

आमदारकीचा राजीनामा दिला. नागेश हे कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत.

या 14 आमदारांचे राजीनामे मंजूर झाल्यास 224 सदस्य संख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेची संख्या 210  होईल. त्यामुळे बहुमतासाठी 113  ऐवजी 106 सदस्य संख्या लागेल.

14 आमदारांचा राजीनामा मंजूर झाल्यावर कुमारस्वामी सरकारच्या आमदारांची संख्या केवळ 104  (विधानसभा अध्यक्ष सोडून) होईल.

त्यामुळे कुमारस्वामी सरकारला बहुमतासाठी दोन जागांची अवश्यकता निर्माण होईल, अशीही चर्चा आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *