Sun. Mar 29th, 2020

गुजरातच्या आमदारांचं वास्तव्य असलेल्या कर्नाटकातील रिसॉर्टवर छापा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

गुजरातमधील काँग्रेस आमदारांचं वास्तव्य असलेल्या कर्नाटकातील ईगलटोन गोल्फ रिसॉर्टवर आयकर विभागानं छापे टाकले आहेत.

 

कर्नाटकचे ऊर्जामंत्री डी के शिवकुमार यांच्या मालकीचा हा रिसॉर्ट आहे. राज्यसभा निवडणुकीआधी 6 आमदारांनी पक्ष सोडल्यानंतर काँग्रेसनं इतर आमदारांना कर्नाटकात

हलवले.

 

हे सर्व आमदार शिवकुमार यांच्या ईगलटोन रिस़ॉर्टवर वास्तव्याला आहेत. या रिसॉर्टसह शिवकुमार यांच्या घरावरही आयकर विभागाने छापा टाकला.

 

या कारवाईमागील कारण अद्याप समजलेलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *