Sun. Aug 25th, 2019

111व्या वर्षी कर्नाटकातील ‘Walking God’ कालवश

98Shares

लिंगायत धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या शिवकुमार स्वामीजी यांचं आज निधन झालं. त्यांचं वय 111 वर्षं होतं. कर्नाटक येथील तुमकूरमधील सिद्धगंगा मठात स्वामीजींनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी 11 वाजून 44 मिनिटांनी त्यांचं निधन झालं. दोन महिन्यांपूर्वी स्वामीजींवर मूत्रपिंडाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दीर्घ आजारामुळेच त्यांचं निधन झालेलं आहे. स्वामीजींच्या निधनामुळे अवघा कर्नाटक शोकाकूल झाला आहे. सायंकाळी 4:30 वाजता त्यांचे अंत्यविधी पार पडले. स्वामीजींच्या दुःखद निधनामुळे कर्नाटकात उद्या सार्वजनिक सुट्टी देण्यात आली आहे. कर्नाटकात तीन दिवस दुखवटा पाळला जाणार असल्याचे एच.डी.कुमारस्वामी यांनी सांगितले.

 

 

स्वामीजींविषयी सविस्तर

स्वामीजींना Walking God ‘देवाचा अवतार’ म्हटलं जायचं.

त्यांचा जन्म 1 एप्रिल 1907 मध्ये कर्नाटक, रामनगर येथिल वीरपुरा गावात झाला होता.

2015मध्ये ‘पद्म विभूषण’ पूरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

‘कर्नाटक रत्न पुरस्कार’चेही ते मानकरी होते.

त्यांचे अनुयायी त्यांना 12व्या शतकातील समाज सुधारक ‘बसवण्णा’ यांचा अवतार मानत होते.

ते सिद्धगंगा शैक्षणिक संस्थेचे संस्थापक होते.

98Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *