Sun. Aug 18th, 2019

फक्त कुठे आणि कधी ते सांग; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक तयार  

0Shares

अभिनेत्री सारा अली खानने जेव्हापासून अभिनेता कार्तिक आर्यनसोबत डेटला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तेव्हापासून कार्तिकला प्रत्येक प्रत्येक मुलाखतीत हाच प्रश्न विचारला गेला आहे. काही दिवसांपूर्वी कार्तिकचे अनन्या पांडेसोबत लंच डेटला गेल्याचेही फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे त्याने साराला नकार दिला की काय अशी चर्चा होती. इतकंच काय तर आईने मला आता कार्तिकला मेसेज करू नकोस असेही  बजावल्याचे साराने सांगितले होते. या सर्व गोष्टींनंतर अखेर कार्तिक सारासोबत डेटला जाण्यासाठी तयार झाला आहे.

‘आता तू आणखी मागे नको लागूस असे साराच्या आईने तिला म्हटल्याचे मी वाचले होते. त्यांना मी उत्तर देणे अपेक्षित होते आणि माझे उत्तर हेच आहे की मी सारासोबत कॉफी डेटला जाण्यासाठी तयार आहे. तिने फक्त कधी आणि कुठे ते मला सांगावे,’ असे कार्तिक नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाला आहे.

‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये साराने तिची इच्छा बोलून दाखवली होती. त्यानंतर कार्तिककडून काही सकारात्मक उत्तर न आल्याने साराच्या आईने फार प्रयत्न न करण्यास सांगितले होते. अखेर कार्तिक साराची इच्छा पूर्ण करण्यास तयार झाला आहे.

अभिनेता रणवीर सिंगनेही सारा आणि कार्तिकची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले होते. एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान रणवीरने साराशी भेट कार्तिकची करून दिली होती.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *