साजिद नाडियाडवाल यांच्यासोबत आता कार्तिक करणार काम

बॉलिवूडचा अभिनेता कार्तिक आर्यन गेल्या काही दिवसांपूर्वी प्रचंड चर्चेत होता. काही महिन्यांपासून दोस्ताना २ या चित्रपटामुळे कार्तिक चर्चेत होता. कार्तिकच्या अनप्रोफेशनल वागण्यामुळे कार्तिकला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं कारण धर्मा प्रोडक्शनने दिलं होतं. त्यामुळे धर्मा प्रोडक्शन २० कोटीचं नुकसान देखील झालं होतं. आता कार्तिक बॉलिवूडमध्ये लोकप्रिय निर्मात्यासोबत म्हणजे साजिद नाडियाडवालबरोबर काम करणार आहे. साजिद यांना बऱ्याच काळापासून कार्तिकसोबत काम करायचे होते. अखेर साजिदयांना कार्तिकसाठी एक उत्तम भूमिका मिळाली आहे.

या भूमिकेत कार्तिक फिट होईल. दरम्यान, त्यांनी कार्तिकशी या चित्रपटासाठी चर्चा देखील केली आहे. साजिद यांच्या या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी दिग्दर्शक समीर विद्धवंस करणार आहेत, असं सूत्रांकडून माहित झालं आहे. बॉलिवूडमध्ये कार्तिक आर्यनची ओळख चॉकलेट बॉय म्हणून आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून साजिद हे कार्तिकसाठी एका लव्हस्टोरीच्या शोधात होते आणि त्यांना एक लव्ह स्टोरी मिळाली आहे. या लव्ह स्टोरीत कार्तिकला साजिद कास्ट करणार आहे. कार्तिकने आता पर्यंत जितक्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यापेक्षा ही भूमिका थोडी हटके असणार आहे. कार्तिकबरोबर कुठली अभिनेत्री या चित्रपट दिसणार याची चर्चा अजूनही सुरु आहे.

Exit mobile version