Wed. Jun 29th, 2022

कार्तिक आर्यनला मागवी लागली रुग्णवाहिकेसाठी सोशल मीडियावर मदत

सध्या देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. देशाभरात या व्हायरसमुळे नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या व्हायरसने अक्षरशः थैमान घातल्याचं चित्र हे दिसून येते आहे. अनेक ठिकाणी रुग्णवाहिका, औषध आणि ऑक्सिजन याची कमतरता आढळून येत आहे. अशात अभिनेता कार्तिक आर्यनलाही रुग्णवाहिका मिळवण्यासाठी सोशल मीडियावरून मदत मागावी लागली आहे. कार्तिक आर्यननं नुकतंच एक ट्वीट केलं होतं. ज्यात त्यानं लिहिलं, ‘प्रयागराजमध्ये माझ्या एका मित्राला लगेचच रुग्णवाहिकेची गरज आहे. कृपया मदत करण्यासाठी संपर्क करा’ कार्तिकच्या या ट्वीटनंतर त्याच्या मित्राला मदत मिळाली. ज्यानंतर कार्तिकनं आणखी एक ट्वीट करत सर्व चाहत्यांचे मदतीसाठी आभार मानले आहेत. त्यानं लिहिलं, ‘मदतीसाठी सर्वांचे आभार.’ गेल्या काही दिवसांपासून कार्तिक आर्यन आणि करण जोहर हे चित्रपट ‘दोस्ताना २’मुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

करण जोहरनं चित्रपटाचं २० दिवसांचं शूटिंग पूर्ण झालेलं असताना कार्तिक आर्यनं प्रोफेशनल वागणूकीचं कारण देत चित्रपटातून बाहेर केलं. कार्तिक आर्यनं अनप्रोफशनल वागणं पाहून धर्मा प्रोडक्शननं त्याला चित्रपटातून बाहेर काढल्याचं बोललं जात आहे. शिवाय मीडिया रिपोर्टनुसार त्यानंतर धर्मा प्रोडक्शननं स्टोरीमध्ये काही बदल करत या चित्रपटासाठी अक्षय कुमारशी संपर्क साधला होता. कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तो शेवटचा इम्तियाज अली यांच्या ‘लव्ह आज कल’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत सारा अली खाननं स्क्रिन शेअर केली होती. आता कार्तिककडे ‘भूल भुलैया २’ ह्या चित्रपटात रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. ज्यात कियारा अडवाणीसोबत तो दिसणार आहे. याशिवाय त्याचा धमाका हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.