Fri. Jul 30th, 2021

कार्तिक आर्यनला करण जोहरनंतर शाहरुखच्या रेड चिलीज प्रॉडक्शन हाऊसमधून दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता

बॉलिवूडचा अभिनेता कार्तिक आर्यन हा नेहमीच चर्चेत असतो. कार्तिकची चाहते हे बरेच आहे. मागील काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक करण जोहरच्या ‘दोस्ताना २’ या चित्रपटात रिप्लेस केल्यानं तो चर्चेत होता. आता कार्तिकला पुन्हा एकदा बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या रेड चिलीज या प्रोडक्शन हाऊस मधून त्याला बाहेरचा रस्ता दाखविला आहे. कार्तिक हा रेड चिलीज प्रोडक्शन हाऊससोबत एक चित्रपट करणार होता. ‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, कार्तिकने साइनिंगची रक्कमही घेतली होती, परंतु क्रीएटिव्ह मतभेदांमुळे कार्तिकने ती रक्कम परत केली असून या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी यावर्षी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार होती. या चित्रपटात कार्तिकसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री कतरिना कैफ दिसणार होती तर या चित्रपटाचे दिग्दर्शन हे दिग्दर्शक अजय बहल करणार होते. शिवाय शाहरुखचे रेड चिलीज प्रॉडक्शन हाऊस या चित्रपटाची निर्मिती करणार होते. दरम्यान, कार्तिक ‘भूल भूलै २’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री कियारा आडवाणी दिसणार आहे. अनीस बज्मी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच कार्तिक हा दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या एका चित्रपटात कार्तिक दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *