Mon. Jan 17th, 2022

कार्तिक आर्यनला आणखी मोठा झटका; ‘दोस्ताना २’ ‘फ्रेडी’ पाठोपाठ आता अनटाइटल्‍ड गॅंगस्‍टर या चित्रपटातून सुद्धा बाहेर काढलं

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचे सध्या दिवस वाईट सुरू आहे एका पाठोपाठ त्याला तीन चित्रपटातून बाहेर काढण्यात आले आहे. पहिल्यांदा कार्तिकला करण जोहरने ‘दोस्ताना २’ मधून बाहेर काढलं, त्यानंतर बॉलिवूडमधल्या किंग खानच्या प्रोडक्शनचा चित्रपट ‘फ्रेडी’मधून बाहेर काढलं. आता फिल्ममेकर आनंद एल राय यांनी देखील कार्तिकला ‘अनटाइटल्ड गॅंगस्टर’ या चित्रपटातून बाहेर काढले आहे. कार्तिक आर्यनच्या हातून एका मागोमाग एक चित्रपट निसटत चालले आहेत. ‘अनटाइटल्ड गॅंगस्टर’ या चित्रपटातून कार्तिकला कशामुळे काढलं हे अद्याप कळलं नाही आहे. हा चित्रपट तिसऱ्या बड्या बजेटचा होता. सध्याला चॉकलेटबॉयचे म्हणजेच अभिनेता कार्तिक आर्यनचे वाईट दिवस सुरू झालेत असंच म्हणावं लागेल. फिल्ममेकर आनंद एल राय यांनीच अभिनेता कार्तिक आर्यनला एका अनटाइटल्ड गॅंगस्टर फिल्मसाठी प्रस्ताव दिला होता. मात्र आनंद एल राय अस का? केलं असावं असा प्रश्न अनेकांना पडत आहे.

या चित्रपटासाठी कार्तिकची फिल्ममेकर आनंद राय यांच्यासोबत शेवटच्या टप्प्यातील बातचीत सुरू होती.मात्र अस काय घडलं की ज्यामुळे कार्तिकला या चित्रपटामधून बाहेर केल्या गेलं कारण असंच काही यापुर्वी सुशांत सिंग राजपूतसोबत घडलं होत. ज्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता. त्यानंतर सुशांत आत्महत्या केली आता असंच कार्तिकबरोबर घडत आहे. आज सुशांत हा आपल्यात नाही मात्र पुन्हा या गोष्टी घडत आहे. यावर नक्की विचार केला पाहिजे. करण जोहरने कार्तिकला त्याच्या ‘दोस्ताना २’ मधून बाहेर काढलं त्यानंतर बॉलिवूडमधील इतर दिग्दर्शकांनी देखील त्याला बाहेर करण्याचा निर्णय घेतला. कार्तिकचा हा तिसरा चित्रपट आहे ज्यातून त्याला बाहेर काढण्यात आलं. कार्तिक आर्यन आणि फिल्ममेकर आनंद राय हे एकत्र एक फिल्म करणार असल्याचं गेल्या फेब्रूवारीमध्येच जाहीर केलं होतं. कित्येकदा तर कार्तिकला आनंद राय यांच्या ऑफिसबाहेर स्पॉट करण्यात आलं होतं. आनंद राय यांच्या चित्रपटातून कार्तिकला बाहेर करण्यात आल्यानंतर त्याच्या जागी आता अभिनेता आयुष्यमान खुरानाची वर्णी लागू शकते, अशी चर्चा सध्या बॉलिवूड विश्वात सुरू आहे.

या चित्रपटाच्या मेकर्सनी आयुष्यमानच्या नावावर चर्चा सुरू केली आहे. यापुर्वी आनंद राय आणि आयुष्यमान खुराना यांनी एकत्र ‘शुभ मंगल सावधान’ आणि ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटात काम केलेलं आहे. त्यामुळे पुढे जाऊन कार्तिकच्या जागी आयुष्यमान खुरानाचं नाव जरी जाहीर झालं तरी जास्त आश्चर्य बाब नसणार आहे. चित्रपटातून कार्तिकल बाहेर काढण्याचं कारण ? कार्तिक हा ‘दोस्ताना २’ आणि ‘फ्रेडी’ या चित्रपटाची स्क्रिप्ट बदण्यासाठी सांगत होतो म्हणून त्याला करण जोहर आणि शाहरूख खानने काढून टाकलं असल्याचं बोललं जातंय. परंतू हे दोन्ही चित्रपट साईन करताना कार्तिकने चित्रपटांच्या स्किप्टवर ना हरकत दर्शवली होती. तरीही कार्तिकला या चित्रपट बाहेर केल्या गेलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *