Sun. Aug 25th, 2019

डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाची दुरवस्था, भरत जाधवचा व्हिडीओ व्हायरल

ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये एसी बंद आहेत. नाटकाचा प्रयोग सुरु असताना या गोष्टीमुळे कलाकारांना त्रास होत असल्याची तक्रार अनेकवेळा केली आहे.

0Shares

ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये एसी बंद आहेत. नाटकाचा प्रयोग सुरु असताना या गोष्टीमुळे कलाकारांना त्रास होत असल्याची तक्रार अनेकवेळा केली आहे. पण यावर कोणताही तोडगा काढण्यात आला नाही. याचं गोष्टीला वैतागून भरत जाधवनेही यासंदर्भात व्यथा मांडली आहे. एक फेसबुक व्हिडीओ करुन त्याने या अडचणी सांगितल्या आहेत.

काय म्हणतो भरत जाधव?

नाटकाचा प्रयोग सुरु आहेत आणि या नाट्यगृहातील एसी बंद आहेत. आम्ही याची कित्येकदा तक्रार केली. मात्र आम्हाला केवळ कारणे देण्यात येत आली.

माझ्याकडे पाहिलं तर तुम्हाला वाटेल मी पावसात भिजलोय, परंतु असं नाहीये. मला हा घाम आला आहे. हे आजचं नसून नेहमीच आहे.

मात्र त्याकडे कोणी लक्ष देत नाही”, अशा शब्दात त्याने नाट्यगृहाची परिस्थीती सांगीतली आहे.

याआधीही अशा तक्रार करण्यात आल्या आहेत, सुमित राघवन, प्रशांत दामले आणि मुक्ता बर्वे यांनीही नाट्यगृहाच्या अवस्थेबद्दल अनेकदा तक्रारी केल्या आहेत.

 

महानगरपालिकेने मागीतली माफी

भरत जाधव यांना जो त्रास झाला त्याबद्दल ठाणे महानगरपालिका तर्फे माफी मागतो, आम्ही कलाकारांना त्रास होऊ नये याची काळजी घेतो.

आम्ही आता पाहणी केली, काल देखील भरत जाधव यांच्या नंतर प्रशांत दामले यांचा शो इथे झाला, पण त्यांची काही तक्रार नव्हती.

कदाचित सेट आणण्यासाठी जो दरवाजा असतो तो उघडा असेल, इथे सिलिंगच काम सुरू आहे, त्यामुळे असेल, एसी थोडी कमी असेल.

आता आम्ही पाहणी केली आहे, आणि जे काही मुद्दे असतील त्यावर तोडगा काढायला सांगितले आहे, यापुढे ठाण्यात कलाकारांना त्रास होणार नाही.

 

 

 

 

 

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *