Mon. May 10th, 2021

जम्मू-काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडरचा खात्मा

शनिवारी श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर मुन्ना लाहोरीचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलं आहे.

शनिवारी श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर मुन्ना लाहोरीचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलं आहे. त्याच्यासोबतचं दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आलं आहे. हे दहशतवादी बोनाबाजार येथे हे दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली मिळाल्यानंतर ही चकमक झाली आहे.

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये चकमक

शोपियाँ जिल्ह्यात बोनाबाजार मध्ये दोन ते दहशतवादी लपून बसल्याची लष्कराच्या जवानांना मिळाली.

यानंतर भारतीय जवानांनी या परिसराला घेराव घातला. एका घरात लपून बसलेल्या दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक झाली आहे.

या चकमकीत दोन्हीकडून गोळीबार झाला.यामध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर मुन्ना लाहोरीचा खात्मा झाला आहे.

मुन्ना लाहोरी हा पाकिस्तानचा रहिवासी असून आयईडी तयार करण्यात तो तरबेज होता. 19 वर्षीय लाहोरीच्या एका साथीदाराचा यात खात्मा झाला आहे.

या चकमकीनंतर या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून इंटरनेटसेवा बंद करण्यात आली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *