Fri. Sep 17th, 2021

काश्मीरमध्ये धोनीला पाहून जमावाच्या आफ्रिदीच्या नावाने घोषणा!

कलम 370 हटवल्यामुळे काश्मिरींना खरंतर फायदा होणार आहे. मात्र काश्मीरमध्ये अजूनही काही जण भारताला आपला शत्रू मानून स्वतःला पाकिस्तानचा घटक मानतात. यापूर्वीही Cricket World Cup 2019 दरम्यान भारताने पाकिस्तानला हरवल्यावर काश्मिर खोऱ्यात काही ठिकाणी ‘मातम’ करण्यात आला होता, तर Semi Finals भारताचा पराभव झाल्यावर आनंद व्यक्त केला गेला होता. अशाच रोषाचा सामना टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी याला करावा लागलाय.

वेस्ट इंडिज दौऱ्यात सहभागी होण्याऐवजी धोनी काश्मीरमध्ये सैनिकांसोबत सध्या सीमेवर पाहारा देतोय.

भारतीयांचा लाडका ‘फिनीशर’ धोनी याचं हे कृत्यही लोकांना पसंत पडलंय.

मात्र धोनी काश्मीरमध्ये असताना बारामुल्ला परिसरात मात्र त्याच्यासमोर बिकट प्रसंग उभा राहिला.

भारत सरकारने कलम 370 रद्द केल्यानंतर बारामुल्ला परिसरात असलेल्या धोनीला पाहून तेथील जमावाने जाणुनबुजून पाकिस्तानच्या माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदीच्या नावाने घोषणा दिल्या.

Social Media वर viral झालेल्या व्हिडिओमध्ये धोनीसमोर लोक ‘बूम बूम आफ्रिदी’च्या घोषणा देत असल्याचं दिसलं.

खरंतर धोनीला पाहण्यासाठी बारामुल्ला परिसरात अनेक लोक जमा झाले होते.

मात्र भारतीय लष्करासह जेव्हा धोनी पोहोचला, तेव्हा जमावातील भारतविरोधी मानसिकता असलेल्या काही लोकांनी मुद्दाम धोनीला चिथावण्यासाठी ‘बूम बूम आफ्रिदी’च्या घोषणा दिल्या.

मात्र आपल्या संपूर्ण कारकिर्दीत ‘कॅप्टन कूल’ नावाने ओळखल्या धोनीने यावेळीही अत्यंत संयमी भूमिका घेत केवळ स्मित केलं.

पाकिस्तानी मीडियाने मात्र या व्हायरल व्हिडिओचा फायदा घेत काश्मिरी लोकांचं भारतावर नव्हे, तर पाकिस्तानवरच कसं प्रेम आहे हे असा निष्कर्ष काढून त्याच्या बातम्या प्रसारित केल्या.

काश्मिरी लोकांना पाकिस्तानी शाहिद आफ्रिदी हाच आपला वाटतो आणि त्यांनी धोनीला हुर्यो केल्याचं पाकिस्तानी मीडियामध्ये दाखवण्यात आलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *