लखनऊमध्ये काश्मीरी विक्रेत्यांना मारहाण

१४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचा निषेध करण्यात आला. त्याचबरोबर काश्मीरी नागरिकांवरही प्रचंड टीका करण्यात आली होती. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये दोन काश्मीरी विक्रेत्यांना मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोघांना मारहाण करण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही मारहाण दोन अज्ञात जणांनी मिळून केली असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र तेथील नागरिकांनी मध्यस्थी करत त्यांची सुटका केली आहे.

नेमकं काय घडलं ?

पुलवामा हल्ल्यामुळे सध्या सगळीकडे तणावाचे वातावरण बघायला मिळत आहे.

देशाचे नागरिक संतप्त असून काश्मीरी नागरिकांवर टीका आणि मारहाण केली आहे.

असाच एक प्रकार लखनऊमध्ये दोन काश्मीरी विक्रेत्यांबरोबर घडला आहे.

काश्मीरी विक्रेते रस्त्यावर ड्राय फ्रुट विकण्यासाठी बसले होते.

यावेळी दोन अज्ञात व्यक्ती तिथे येऊन मारहाण करण्यास सुरुवात केली.

ही मारहाण काठीने केली असून या दोघांकडे आधार कार्डदेखील मागितले.

काश्मीरी विक्रेत्यांना मारहाण करत त्यांना येथून निघून जाण्यास सांगितले.

मारहाण होत असल्याचे बघून नागरिकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत त्यांना मारहाण करण्याचे कारण विचारले.

काश्मीरी असल्यामुळे त्यांना मारहाण करत असल्याची माहिती या दोन्ही अज्ञातांनी दिली.

या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी या दोघांपैकी एका आरोपीला अटक केली आहे.

या आरोपीचे नाव बजरंग सोनकर आहे. यापूर्वी बजरंग याच्यावर १२ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 

 

Exit mobile version