Sun. Oct 24th, 2021

कठुआ बलात्कार प्रकरण: तिघांना जन्मठेप, तिघांना 5 वर्षं कैद

कठुआ येथे आठ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची अमानुष हत्या करणाऱ्या सातपैकी सहा आरोपींनी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यातील सहापैकी तिघांना जन्मठेप तर तिघांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सांझी राम, दीपक खजुरिया, सुरेंद्र वर्मा, तिलक राज, आनंद दत्ता, परवेश कुमार अशी गुन्हेगारांची नावं आहेत.

‘यांना’ जन्मठेपेची शिक्षा-

सांझी राम

दिपक खजुरीया

परवेश कुमार

‘यांना’ 5 वर्षांची शिक्षा-

सुरेंद्र वर्मा

हेड कॉन्स्टेबल तिलक राज

आनंद दत्ता

 

गेल्या वर्षी १० जानेवारी रोजी मुलीचं अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती.या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. या प्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाची इन-कॅमेरा सुनावणी तीन जून रोजी पूर्ण झाली. याचा अंतिम निकाल आज लागणार आहे. या प्रकरणी  सात पैकी सहा आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आहे.

यांतील सांझी रामचा मुलगा आरोपी विशाल घटनेच्या वेळी तिथं उपस्थित नसल्याचं कोर्टात सिद्ध झाल्यानं त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

गावचा मुखिया सांझी राम हा या प्रकरणातील मुख्य आरोपी होता.

त्यानेच बलात्कारानंतर बालिकेची निर्घृण हत्या केली होती.

परवेश कुमार हा गावचा सरपंच होता.

गुन्हेगारांतील दीपक खजुरिया आणि सुरेंद्र वर्मा हे विशेष पोलिस अधिकारी होते.

तिलक राज हा हेड कॉन्टेबल होता.

आनंद दत्ता हा पोलीस उपनिरीक्षक होता.

कठुआ प्रकरणाचा आज अंतिम निकाल

जम्मू- काश्मीरमध्ये एका 8 वर्षीय मुलीवर सामुहीक बलात्कार करण्यात आला होता.

8 दिवस या मुलींला मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवण्यात आलं होतं.

मुलीचा मृतदेह आढळल्याने हा प्रकार उघडकीस आला होता.

या प्रकरणी पठाणकोटमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयात दररोज सुनावणी झाली.

या प्रकरणात गावाचे प्रमुख सांजी राम, त्यांचा मुलगा विशाल, अल्पवयीन भाचा, विशेष पोलिस अधिकारी दीपक खजुरिया आणि सुरेंदर वर्मा यांना अटक करण्यात आलं.

हेड कॉन्स्टेबल तिलक राज आणि उपनिरीक्षक आनंद दत्ता यांनाही अटक करण्यात आली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *