Fri. Dec 3rd, 2021

स्मशानातील मुडदे देखील असुरक्षित, चोरांकडून चक्क कवटीची चोरी

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

चोरी कशाची होईल याचा काही नेम नाही. कारण चोरांनी चक्क स्मशानातून एका मृतदेहाच्या कवटीची चोरी केली आहे. ही धक्कादायक घटना सांगलीच्या जत तालुक्यातील हळ्ळी भागात घडली.

 

दरम्यान, भानामतीसाठी अंधश्रद्धेतून ही चोरी झाल्याची चर्चा सुरु आहे. मंगळवारी सकाळी काही लोक या स्मशानभूमीत गेले होते. त्यावेळी थडगे उकरलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं हा संपूर्ण प्रकार समोर आला.

 

या मृतदेहाची कवटी नसल्याचं त्यावेळी या लोकांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा करत अज्ञाताविरोधात कवटी चोरून नेल्याचा गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *