KDMC च्या बस चालकाने चक्क छत्री धरून चालवली बस
केडीएमसीच्या एका गळक्या बसमध्ये चालक चक्क छत्री धरून बस चालवत असल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकंच नव्हे, तर प्रवाशांच्याही डोक्यावर धारा लागल्यानं त्यांनाही बसमध्येच छत्र्या उघडून बसावं लागलं.

केडीएमसीच्या एका गळक्या बसमध्ये चालक चक्क छत्री धरून बस चालवत असल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकंच नव्हे, तर प्रवाशांच्याही डोक्यावर धारा लागल्यानं त्यांनाही बसमध्येच छत्र्या उघडून बसावं लागलं. केडीएमसीच्या बसमधल्या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश परिवहन सभापतींनी दिले आहेत.
केडीएमटीची गळकी बस
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची परिवहन सेवा नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणांमुळे वादात असते.
त्यातच पावसाळा सुरू झाल्यानंतर चक्क बसमध्येच पावसाचं पाणी गळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
त्यामुळं चालकाला चक्क डोक्यावर छत्री धरून बस चालवावी लागली. तर प्रवासीही बसमध्येच छत्री उघडून बसावे लागले आहे.
या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि केडीएमटीच्या अब्रूची लक्तरं निघाली.
हा व्हिडीओ शुक्रवारचा असल्याचं सांगितलं जातं आहे.
या प्रकाराची केडीएमसी परिवहन सभापती मनोज चौधरी यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधितांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
यात जो कुणी दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन चौधरी यांनी दिलं आहे.