केदार भेगडे यांचा युवकांसमोर आदर्श

पुणे: सध्या राज्यातील कोरोनाची परस्थिती भयंकर असून जागतिक महामारीत असंख्य रुग्णांना ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन तळेगाव येथील केदार भेगडे यांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळत कोविड रुग्णालयांना मोफत १०० जंबो सिलेंडर दिले आहेत.

मावळ तालुक्यातील अनेक रुग्णालयांना प्राणवायूची गरज भासत असल्यास त्यांनी मोकळे सिलेंडर दिले तर ते सिलेंडर भरून देण्यात येतील, असं भावनिक आवाहनदेखील या युवकाने केलं आहे.

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते या ऑक्सिजन सिलेंडरचं हस्तांतरण खासगी रुग्णालयात केलं. प्राणवायूच्या अभावामुळे राज्यात अनेक रूग्ण मृत्यूमुखी पडत आहेत. या तरुणाने समाजातील सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.

Exit mobile version