Wed. Jun 19th, 2019

World Cup 2019 : टीम इंडियामध्ये केदार जाधव सुद्धा खेळणार

0Shares

इंग्लंडमध्ये ३० मे पासून विश्वचषक स्पर्धा सुरू आहेत. मधल्या फळीतला भारताचा महत्वाचा खेळाडू म्हणजेचं केदार जाधवच्या खांद्याला आयपाएलमध्ये खेळताना दुखापत झाली होती. त्यामुळे तो विश्वचषकासाठी खळेल की नाहूी याची शंका होती. परंतु केदार जाधव विश्वचषकासाठी तंदुरुस्त ठरला आहे. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेआधी भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसी येखील प्रशिक्षण केंद्रात केदारने पॅट्रीक फरहात यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सकाळी फिटनेस टेस्ट पास केली आहे.

केदारमुळे संघाला दिलासा

गेल्या काही सामन्यांमध्ये केदारने उत्तम फलंदाजी आणि गोलंदाजी केली आहे,

यामुळे त्याची भारतीय संघात आपली जागा पक्की झाली होती.

केदारने आतापर्यंत 59 वन-डे सामन्यांमध्ये 1174 धावा केल्या आहेत.

43-50 च्या सरासरीने केदारने आतापर्यंत दोन शतकं आणि 5 अर्धशतकं झळकवली आहेत.

केदार जाधवने आतापर्यंत 27 बळी घेतले आहेत.

म्हणूनच त्याच्या संघात असण्यामुळे भारतीय संघाला दिलासा मिळाला आहे,

चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळत असताना पंजाबविरुद्ध सामन्यात त्याला दुखापत झाली होती.

गुरूवारी सकाळी त्याने फिटनेस टेस्ट पास केली आहे.

केदार जाधव टीम इंडियासोबत २२ मे ला इंग्लंडसाठी रवाना होऊ शकणार आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: