Thu. Jun 20th, 2019

जा रे जा रे पावसा.. माझ्या महाराष्ट्रात जाऊन बरस.. केदारची पावसाला साद

0Shares

अख्या महाराष्ट्र पावसाच्या प्रतिक्षेत आहे. परंतु वायू चक्रियवादळामुळे मान्सून उशीरा येणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत पावसाने चांगलाच खेळ केला आहे. आतापर्यंत दोन लढती पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द झाल्या आहेत, तर एक लढत अनिर्णित राहिली आहे. तिकडे इंग्लंडमध्ये पावसामुळे वर्ल्ड कपचे सामने रद्द होतं आहेत. त्यामुळे भारतीय संघातील केदार जाधव याने पावसाला एक भावनिक साद घातली आहे. जा रे जा रे पावसा.. माझ्या महाराष्ट्रात जाऊन बरस,तुला माझ्या महाराष्ट्रात जायची गरज आहे, तिकडे जास्ती गरज आहे पावसाची, इकडे नाही’ अशी साद केदार जाधव याने इंग्लंडमधील पावसाला घातली आहे.

केदार जाधवची भावनिक साद

केदार जाधवची भावनिक साद सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत आहे.या व्हिडीओमध्ये केदार जाधवने

इंग्लंडमधील पावसाला एक भावनिक साद घातली आहे.

पावसामुळे इंग्लंडमधील वर्ल्ड कपचे सामने रद्द होत आहेत. त्यामुऴे केदारने ही साद घातली आहे.

जा रे जा रे पावसा.. माझ्या महाराष्ट्रात जाऊन बरस अशी साद या व्हिडीओमध्ये त्यांनी घातली आहे.

तुला माझ्या महाराष्ट्रात जायची गरज आहे, तिकडे जास्ती गरज आहे पावसाची, इकडे नाही’ अशा अशयाची ही 10 सेकंदाची क्लीप आहे.

वर्ल्डकपसाठी सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये आहे.

वर्ल्डकप सुरू असताना अनेक सामने पावसामुळे रद्द करण्यात येत आहेत. तर भारतात पावसाने अद्याप म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही.

अशातच आजपासून पावसाला सुरुवात झाली असल्याने केदारची साद गगनाला भिडली असल्याचे म्हंटले जातं आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: