Thu. Jul 9th, 2020

केजरीवाल यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ

भाजपा आणि काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत पराभव केल्यानंतर आम आदमी पार्टी हॅट्रिक करत सत्तेवर विराजमान झाला आहे. ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

केजरीवाल यांच्यासह इतर सहा नेत्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. दिल्लीतील रामलीला मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडला.

दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी केजरीवाल यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. त्यांच्या पाठोपाठ मनिष सिसोदिया, इम्रान हुसेन, गोपाल राय, राजेंद्र पाल गौतम, सत्येंद्र जैन, कैलाश गेहलोत यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

केजरीवाल यांनी ईश्वरसाक्ष शपथ घेतली. गोपाल राय यांनी स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना स्मरून शपथ घेतली.

इम्रान हुसेन यांनी अल्लासाक्ष मंत्रिपदाची शपथ घेतली तर ईश्वरसाक्ष गोपनीयतेची शपथ घेतली.

राजेंद्र गौतम यांनी भगवान बुद्धाला स्मरून शपथ घेतली.

या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास निमंत्रण होतं. इतर राज्यांचे मुख्यमंत्रीही आमंत्रित होते. विशेष म्हणजे दिल्लीच्या विकासात योगदान देणारे डॉक्टर, रिक्षा चालक, सफाई कर्मचारी, कामगार, अग्निशमन दलाचे जवान यांना आमंत्रित केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *