Thu. May 19th, 2022

KEM हॉस्पिटलच्या शवविच्छेदनगृह आणि शवागाराची दुरवस्था!

मुंबईमधील परळसारख्या मध्यवर्ती ठिकाणीं असणारं KEM हे शहरातलं मोठं रुग्णालय आहे. मुंबई आणि मुंबई बाहेरचे अनेक रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. विशेष म्हणजे सगळ्या आधुनिक सुविधा या रुग्णालयात असताना KEM च्या शवविच्छेदनगृह आणि शवागाराची मात्र दुरावस्था झालीये.

ज्या ठिकाणी शव विच्छेदन करण्यात येतं, त्या खोलीचा स्लॅब पडण्याच्या बेतात आहे. हा स्लॅब कोसळू नये, म्हणून त्याची दुरुस्ती करण्याऐवजी चक्क जाळ्या लावण्यात आल्या आहे. यामुळे जर चुकून एखादी दुर्घटना झाली तर कोणालाही हानी पोहचू शकते.

त्यातच त्या ठिकाणी नेहमी दुर्गंधी, घाण असते.

शव विच्छेदनानंतर निघणाऱ्या मानवी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली पाहिजे.

मात्र ती घाण कित्येक दिवस तशीच पडलेली आहे.

जे कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात त्यांच्याही आरोग्याची काळजी घेतली जात नाही.

दुसरीकडे तर कधी कधी डॉक्टर नसताना कर्मचारी शव विच्छेदन करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय.

 

शवागाराचीही दुरावस्था!

अनेक दिवसांचे बेवारस मृतदेह हे शवागारात लॉकरमध्ये पडून असतात.

तर काही मृतदेह हे असेच बाहेर केवळ चादर टाकून खाटेवर उघड्यावर ठेवले जातात.

यामुळे ते मृतदेह कुजत असून त्यातून मोठ्या प्रमाणात दुर्घंधी येते.

यामुळे कर्मचाऱ्यांच्याही आरोग्यावर परिणाम होत आहे.

मात्र यावर अनेकदा पाठपुरावा करूनही याची दाखल प्रशासनाकडून घेतली जात नाही.

याबात स्थानिकांनीही पाठपुरावा केला. पण प्रशासन निष्क्रिय आहे.

कर्मचाऱ्यांना जर यामुळे त्रास होत असेल, तर नक्कीच प्रशासनाने याची दखल घेणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.