Jaimaharashtra news

ओणमची परंपरा महापुरामुळे खंडित

जय महाराष्ट्र वेब न्यूज, केरळ

केरळमध्ये थैमान घातलेल्या महापुरामुळे केरळवासीयांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. त्यामुळे केऱळातील त्यामुळे अनेक लोकांना विविध ठिकाणी आसरा घ्यावा लागला आहे.

या महापुराचा फटका संपूर्ण केरळ राज्याला बसलेला आहे आणि म्हणूनच केरळचं नववर्ष मानला जाणारा किंवा केरळवासीयांची दिवाळी म्हणून ओळखला जाणारा ओंणम हा सण साजरा न करण्याचा निर्णय केरळवासीयांनी घेतला आहे.

दरवर्षी ज्यावेळेला ओंणम साजरा व्हायचा त्यावेळेला संपूर्ण राज्यात प्रत्येकाच्या घराबाहेर रांगोळी काढली जायची, गोडधोड केलं जायचं , नौकानयनाच्या स्पर्धा घेतल्या जात होत्या मात्र आता या संपूर्ण शहरावर दुःखाचं सावट पसरलं आहे.

Exit mobile version