Tue. Jun 28th, 2022

केतकी चितळेला २४ मेपर्यंत पोलीस कोठडी

केतकी चितळेला ठाणे सत्रन्यायालयाने २४ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गोरेगाव आणि रबाळे पोलासांनी तिची ताब्याती मागणी केली होती. परंतू तिचा ताबा रबाळे पोसीलांना देण्यात आला आहे. २०२० मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होता. पोलिसांनी न्यायालयात केतकीच्या कोठडीची मागणी केली होती. शरद पवारांवर केतकीने समाजमाध्यमांवर वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. केतकीने वापरलेलं प्रत्येक समाजमाध्यमाचा पोलिस तपास करत आहे. शनिवारी तिला वाशी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

केतकी चितळे हिने शरद पवारांवर वादग्रसत् पोस्ट शेअर केल्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात तिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. केतकी चितळे हीने या आधी अनेक वादग्रस्त पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यामुळे अशा वादग्रस्त पोस्टमुळे केतकी नेहमीच चर्चेत असते. केतकी हिने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता त्यामुळे देखील केतकची पोस्ट चर्चेत आली होती. केतकी हीचा लॅपटॉप आणि मोबाईल देखील पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. तिला ही पोस्ट कोणी करायला सांगितली की तीने ही पोस्ट स्वत:हून केली याचा पोलिस शाखेचे युनिट – १ अधिक तपास करत आहे.

सर्वप्रथम केतकीला नवीमुंबई कामोठे येथील पोलीसांनी ताब्यात घेतले होते. तिला कळंबोली पोलिस ठाण्यातून बाहेर नेत असताना तिच्यावर शाई फेक आणि अंडी फोडली होती त्यामुळेच आता अशा प्रकारे कोणीही करू नये यासाठी रबाळे पोलिस ठाण्याच्या बाहेर पोलीसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.