Fri. Oct 7th, 2022

खान पितापुत्राला धमकी

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. सलमानसोबत त्याचे वडील सलीम खान यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानचे वडील सलीम खान हे सकाळी जॉगिंगसाठी गेले होते. तिथे ते एका बेंचवर बसले असता त्यांना एक पत्र मिळालं. ज्यामध्ये त्यांना आणि त्यांचा मुलगा सलमान खानला धमकी देण्यात आली होती. या पत्रात लिहिलं होत की, सलमान खान याचा सिद्धू मुसेवाला करून टाकू. सकाळी ७.३० ते ८ च्या सुमारास सलीम खान यांना हे पत्र मिळाले. हे धमकीच पत्र मिळाल्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलीस स्थानकात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. अनेक लोकांनी त्याच्यावर एकाचवेळी हल्ला केला आणि सुमारे २५-३० गोळ्या झाडन त्याची हत्या केल्याचा प्रकार घडला. या हल्ल्यात मुसेवाला यांना जीव गमवावा लागला. सिद्धू मुसेवाला यांच्या निधनानंतर पंजाबसह संपूर्ण गायन उद्योगात शोककळा पसरली आहे. मुसेवालाचे मारेकरी कधी पकडणार, हा एकच प्रश्न सर्वांच्या मनात घुमत आहे.

दरम्यान, सलमान खानला धमकीचे पत्र आल्यानंतर त्याचे चाहते सोशल मीडियावर चिंता व्यक्त करत आहे. आता सलमान खानला आलेल्या या धमकीनंतर खळबळ उडाली आहे. या पत्रानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.