Wed. Oct 5th, 2022

खेलो इंडिया : सांगलीतील काजोलने पटकावले सुवर्णपदक

सांगलीत पानपट्टी चालवणाऱ्याच्या मुलीने खेलो इंडिया स्पर्धत सुवर्णपदक पटकावले आहे. वेटलिफ्टिंग खेळात काजोल महादेव सरगर हिने ४० किलो वजनाखालील वजनी गटात आपल्या महाराष्ट्राला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. खेलो इंडियानंतर काजोलची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली असून काजोलने आता ऑलम्पिक स्पर्धेसाठी तयारी सुरू केली आहे.

सांगलीतील दिग्विजय इन्स्टिट्यूटमध्ये काजोल आपले कोच मयूर सिंहासने यांचेकडे प्रशिक्षण घेत आहे. मोठ्या जिद्दीने तिने प्रशिक्षण घेत हरियाणा येथे ५ जून रोजी पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत तिने ४० किलो वजनी गटात सहभाग घेतला. या वजनी गटात एकूण १३ खेळाडू स्पर्धक सहभागी होते. या सर्वांना मागे टाकत काजोलने तीन लिफ्ट क्लिअर करत सुवर्णपदक पटकावले. यापुढे जाऊन काजोलला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकून आपल्या देशासाठी सुवर्णपदक आणायची इच्छा असून ऑलम्पिकसाठी सुद्धा तिने तयारी सुरू केली आहे. जिद्द असेल तर परिस्थितीवर सुद्धा मात करता येते हे काजोलने दाखवून दिले आहे. आपले आईवडील काबाडकष्ट करतात आशा परिस्थितीत काजोलने मिळवलेले यश नक्कीच नव्या पिढीला प्रेरणादायी ठरणारे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.