भारतीय जवानांचे ‘खुकुरी नृत्य’ सोशल मीडियावर व्हायरल

भारतीय लष्कर सैन्य जीवाची पर्वा न करता सीमेवर देशाचे रक्षण करत असतात. दरम्यान भारतीय लष्कर दलाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच आता भारतीय जवानांचा नृत्यू करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात भारतीय जवान ‘खुकुरी नृत्य’ करताना दिसत आहेत.
भारतीय लष्कर जवान उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात ‘खुकुरी नृत्य’ करतानाचा व्हिडिओ एका वृत्तसंस्थेने सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सैनिक बर्फाळ भागात ‘खुकुरी नृत्य’ करताना दिसत आहेत. भारतीय लष्कराचे एकूण नऊ जवान बर्फाळ भागात राष्ट्रध्वजाच्या पुढे ‘खुकुरी नृत्य’ करत आहेत.