Mon. Aug 19th, 2019

11 महिन्याच्या लहान बाळाचा पाण्याच्या बादलीत पडून दुर्दैवी मृ’त्यू

0Shares

नाशिकच्या पंचवटी मधील मोरे मळा परिसरात अवघ्या 11 महिन्याच्या लहान बाळाचा पाण्याच्या बादलीत पडून दुर्दैवी मृ’त्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात आता हळहळ व्यक्त होतीये.  घरात इकडे तिकडे रांगत फिरणारा तन्मय आज अचानक घर सोडून गेलाय. त्यामुळे घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

तन्मय काल झोपी गेला असताना आई दुकानात काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेली होती.

इतर दोन लहान मुलांना या लहान बाळावर लक्ष ठेवण्यास सांगितलं होतं. मात्र, ही दोन्ही मुलं टीव्ही बघत बसली आणि त्यातच ती रमून गेली.

झोपलेला तन्मय उठला आणि बाथरुमकडे रांगत रांगत गेला.

बाथरूममध्ये एक पाण्याची बादली भरली होती. त्याच बादलीचा आधार घेत तन्मय उभा राहायचा प्रयत्न तन्मय करू लागला.

त्याचा तोल जाऊन तो बादलीत खाली डोकं आणि वर पाय या अवस्थेत पडला.

नाकातोंडात पाणी जाऊन त्याचा श्वास कोंडला गेला.

ही बाब निदर्शनास येताच भोये कुटुंबियांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केलं.

मात्र, डॉक्टरांनी तपासून तन्मयला मृत घोषित केलं.

या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना पालकांच्या निष्काळजीपणामुळेच घडल्याचं म्हटलं, तरी जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे. पालकांनी लहान मुलांना घरात एकटं सोडून कुठेही जाऊ नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *