Thu. Jan 27th, 2022

2 वर्षांच्या चिमुकलीचं ठाणे स्टेशन परिसरातून अपहरण करणाऱ्या दोघींना अटक

ठाणे पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसरातून दोन वर्षांच्या चिमुकलीचे भीक मागण्यासाठी अपहरण करणाऱ्या एका महिलेसह तिच्या साथीदार महिलेस ठाणे मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने परभणी येथून अटक केली. सीमा पवार आणि अनिता जगमित्र भोसले असे अटक करण्यात आलेल्या दोघा महिलांची नावे आहेत.

जालना जिल्ह्यातील पिंपळगाव येथील यमुना रोहित नरवडे ही महिला कामाच्या शोधात ठाण्यात आली होती.

यमुना हिला एक वर्षाचा मुलगा प्रेम आणि दोन वर्षाची मुलगी प्राजक्ता अशी दोन अपत्यं आहेत.

कामधंदा आणि जवळ पैसे नसल्याने यमुना ठाणे पूर्वेकडील रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेतच आपल्या मुलांसह राहत होती.

दरम्यान,  26 सप्टेंबर 2019 रोजी रात्री ती आपल्या मुलांसह स्टेशन समोरील मोकळ्या मैदानात झोपलेली असतांना कुणीतरी अज्ञात इसमाने तिच्या जवळील दोन वर्षाच्या मुलीचे अपहरण करून नेले.

या प्रकरणी कोपरी पोलिसात गुन्हा दाखल होताच घटनेचे गांभीर्य ओळखून अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेस दिले होते.

ठाणे मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलिसांनी तपासाला सुरवात केली.

तपासादरम्यान संबंधित दोन वर्षाच्या बालिकेच्या अपहरणामागे एक महिला व तिचा अकरा वर्षाचा मुलाचा हात असल्याचे निष्पन्न झाले.

तिच्या बाबत सखोल तपास केला असता गुन्ह्यातील महिला आरोपीही परभणी येथे असल्याचे आढळून आले.

त्या प्रमाणे पोलीस पथक परभणी येथे रवाना झाले व तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने अनिता जगमित्र भोसले आणि सीमा पवार व तिचा 11 वर्षाचा मुलगा यांना ताब्यात घेतले.

त्यानंतर पोलिसांनी सीमा व तिच्या मुलास ताब्यात घेतले. पोलिसांनी मुलीची सुखरूप सुटका केलेल्या मुलीला पोलिसांनी तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *