Jaimaharashtra news

पालकांनो, सावधान! सोसायटीमधून लहान मुलीचं ‘तो’ करत होता अपहरण, पण…

एका तीन वर्षाच्या चिमुकलीला आमिष दाखवून पळवून नेण्याच्या बेतात असलेला अपहरणकर्ता सुदैवाने वेळीच पकडला गेला. डोंबिवली जवळच्या पलावा सोसायटीमध्ये ही घडली. सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे हा किडनॅपर पोलिसांच्या हाती लागला आहे. जितेंद्र सहनी असं या अटक तरुणाचे नाव आहे.

काय घडलं नेमकं?

कल्याण-शिळ रोडला लोढा पलावा कासारिओ या हायप्रोफाईल सोसायटीच्या गार्डनमध्ये गुरुवारी हा प्रकार घडला.

रात्री 9 वाजण्याच्या सुमारास 3 वर्षांची चिमुरडी आपल्या मित्रांसह खेळत होती.

यावेळी जितेंद्र सहानी नामक इसम गार्डनमध्ये तिच्यावर पाळत ठेवून होता.

अचानक संधी साधत त्याने या चिमुरडीला उचलले आणि पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

मात्र या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या सुरक्षारक्षकाला संशय आल्याने त्याने जितेंद्रला अडवलं आणि आरडाओरड केला.

यावेळी जमलेल्या लोकांना घडला प्रकार लक्षात आला.

त्यांनी जितेंद्रला पकडून बेदम चोप देत मानपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले.

या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात जितेंद्र सहानी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Exit mobile version