Tue. Sep 28th, 2021

नायर रुग्णालयातून पाच दिवसाच्या बाळाचे अपहरण

मुंबईतील नायर रुग्णालयातून पाच दिवसाचे बाळ चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. नायर रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक सातमधून एका अनोळखी महिलेने बाळ चोरल्याचे समोर आले आहे. रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सदर घटना कैद झाली आहे. आकाशी रंगाचे कपडे परिधान केलेल्या महिलेने बाळ चोरल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं होत. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.नायर हॉस्पीटल बाळ चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी सहा तासांत आरोपीला अटक केली. हेजल असं बाळ चोरणाऱ्या महिलेचं नाव आहे. बाळासह वाकोल्यातून अटक करण्यात आली आहे.

नेमकं काय प्रकरण ?

पाच दिवसाच्या बाळाला पळवून नेल्याची घटना नायर रुग्णालयात  गुरुवारी घडली होती.

बाळाची आईला  झोप लागली असताना एका महिलेने बाळ पळवून नेले

हे सर्व सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पाच दिवसांपूर्वी  शीतल साळवी वय 34 यांची सिझेरियन पद्धतीने प्रसूती झाली होती.

शीतल झोपल्या असताना त्यांच्या जवळच बाळ झोपवले होते. आणि त्यांना जाग आली तेव्हा बाळ गायब होते.

लगेचच रुग्णालयात कळविण्यात  आले आणि नातेवाइकांनी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली.

या  वार्डमधील सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली असता आकाशी रंगाच्या कुर्त्यांमध्ये एक महिला वार्डमध्ये  फिरत होती.

यावरून पोलीसांनी तपास घेतला असता त्या महिलेला पोलीसांनी अटक केली आहे.

नायर हॉस्पीटल बाळ चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी सहा तासांत आरोपीला अटक केली.

हेजल असं बाळ चोरणाऱ्या महिलेचं नाव आहे. बाळासह वाकोल्यातून अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *