Jaimaharashtra news

आयपीएल २०२० सुरुवातीआधीच टीम मुंबईला मोठा धक्का

आयपीएल २०२० टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या १३ व्या हंगामाला अवघे काही दिवस उरले आहे. दरम्यान या आयपीएलच्या १३ व्या हंगामाआधी टीम मुंबईला मोठा धक्का बसला आहे.

टीम मुंबईचा तडाखेबाज खेळाडूला दुखापत झाली आहे.

सध्या पाकिस्तान प्रिमिअर लीग सुरु आहे. या स्पर्धेदरम्यानच्या एका सामन्यात कायरन पोलार्ड दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे पोलार्डने या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

तसेच या दुखापतीतून सावरण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागणार आहे.

त्यामुळे मुंबईसाठी ही निराशाजनक बाब आहे. कायरन पोलार्ड हा कोणत्याही क्षणी मॅचचा निर्णय बदलण्याची क्षमता ठेवतो. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तीनही विभागांमध्ये पोलार्डने आपल्या कामगिरीने ठसा उमटवला आहे.

पोलार्डची आयपीएलमधील कामगिरी

कायरन पोलार्डने आयपीएलमध्ये एकूण १४८ सामने खेळले आहेत. यात त्याने बॅटिंग करताना १४६ च्या स्ट्राईक रेटने २ हजार ७५५ धावा केल्या आहेत.

यामध्ये १४ अर्धशतकांचा समावेश आहे. पोलार्डची ८२ ही सर्वोच्च खेळी आहे.

तसेच पोलार्डने बॉ़लिंग करताना ५६ विकेट घेतले आहेत. ४४ धावा देऊन ४ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

कोरोनामुळे आयपीएल क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलण्याची शक्यता

आयपीएलच्या नियोजित तारखेनुसार ही स्पर्धा २९ मार्चपासून सुरु होणं अपेक्षित आहे. परंतु कोरोनाच्या सावटामुळे ही स्पर्धा किती दिवसांच्या विलंबाने सुरु होणार, याबद्दल काहीच सांगता येणार नाही.

Exit mobile version