‘या’ राजाचा २० गर्लफ्रेंड्ससोबत क्वारंटाईन!

कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊन दरम्यान थायलंडचा राजा मात्र चर्चेचा विषय ठरलाय. कारण कोरोनाच्या भीतीने हा राजा आय़सोलेशनमध्ये राहतो आहे. स्वतःला या राजाने जर्मनीच्या एका हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये बंद केलं आहे. मात्र आयसोलेशनमध्ये हा राजा एकटा नव्हे,तर त्याच्या २० गर्लफ्रेंड्ससोबत राहतोय. महा वाजिरालोंगक़ॉर्न असं या राजाचं नाव आहे. या राजाचं वय ६७ वर्षं आहे.
२० गर्लफ्रेंड्स पण ४ राण्या कुठे?
या राजाला ४ राण्या आहेत. मात्र यांपैकी १ तरी राणी यावेळी राजाच्या सोबत आहे का याबद्दल शंका व्यक्त केली जातेय. राजा वाजिरालोंगकोर्न याने ४ लग्न करूनही तो रंगेल आयुष्य जगतो. त्याची तिसरी पत्नी श्रीरास्मी सुवादे हिचा अश्लील व्हिडिओदेखील लीक झाला होता. त्यामुळे तिच्यावर टीकाही झाली होती. मात्र आपल्या राजकुटुंबातील कोणत्याही व्यक्तीवर कुणीही टीका केल्यास त्याला ३५ वर्षांची शिक्षा देण्यात येते.
लग्नापूर्वीही राजाचे अभिनेत्री युवहिदा पोलप्रसेरशी प्रेमसंबंध होते. तिच्यापासून तेव्हाच त्याला ५ मुलंही आहेत. त्यानंतर जिच्याशी १५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते, त्या प्रेयसीशी त्याने दुसरं लग्न केलं.