Sat. Apr 20th, 2019

#IPL2019 पंजाबचा रॉयल विजय; राजस्थानचा 12 धावांनी पराभव

18Shares

किंग्ज XI पंजाब आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात पंजाबने राजस्थानचा 12 धावांनी पराभव केला. पंजाबने प्रथम फलंदाजी करत राजस्थानला 183 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचे पाठलाग करताना राजस्थानने 170 धावा करत आपला खेळ आटोपला. पंजाब संघाचे राहुलने अर्धशतक पूर्ण केले तर मिलरने 40 धावा केल्या.

पंजाबचा ‘रॉयल’ विजय –

पंजाब आणि राजस्थानमध्ये मंगळवारी झालेला सामना मोहालीमध्ये रंगला.

राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

पंजाबने राजस्थानला 183 धावांचे आव्हान दिले.

या आव्हानाचे पाठलाग करताना राहुल आणि मिलरने चांगली कामगिरी बजावली.

ख्रिस गेलने 22 चेंडूत 30 धावा केल्या आणि तंबूत परतला.

राहुलने 52 धावा करत अर्धशतक पूर्ण केले तर मिलरने 40 धावा केल्या.

मात्र पंजाबने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने 170 धावा करत आपला खेळ आटोपला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *