Sat. Oct 1st, 2022

अनिल परबांनी कपड्यांची बॅग तयार ठेवावी – किरीट सोमैया

शिवसेना नेते आमि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानासह ७ ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यामुळे आता अनिल परबांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दरम्यान, अनिल परब यांच्यावर झालेल्या कारवाईवर भाजप नेते किरीट सोमैया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मविआ नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर आता अनिल परब यांनी कपड्यांची बॅग तयार ठेवावी, अशी टीका किरीट सोमैया यांनी केली आहे.
सचिन वाझे १०० कोटी वसुली प्रकरणी अनिल परब यांचे नाव आले होते. तसेच राज्यांतील पोलीस बदल्यांमध्येही अनिल परबांचं नाव समोर आलं. दरम्यान, दापोलीतील अनधिकृत रेसॉर्टप्रकरणी अनिल परब ईडीच्या रडारवर होते. त्यानंतर पर्यावरण मंत्रालयाने दापोली न्यायालयात परबांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला. अशाप्रकारे अनिल परब यांनी शेकडो कोटींचे आर्थिक गैरव्यवहार केले असल्याचे किरीट सोमैया म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.