Sat. Jul 31st, 2021

‘टोपे यांचा राजीनामा घेऊन घरी पाठवलं पाहिजे’

विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत १३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. मध्यरात्री आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत या रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. याचसंदर्भात भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत ठाकरे सरकारने प्रतिष्ठेचा मुद्दा बाजूला ठेऊन केंद्र सरकारची मदत घेतली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. तसेच विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

‘ठाकरे सरकारने आता हा प्रतिष्ठेची मुद्दा न बनवता केंद्र सरकार, लष्कराची मदत घ्यावी. महाराष्ट्रातील सर्व कोव्हिड केंद्रामधील ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तातडीने करण्यात यावं. यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी. तसेच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा राजीनामा घेऊन त्यांना घरी पाठवलं पाहिजे’, असं मत सोमय्या यांनी व्यक्त केलं आहे.

संपादन – सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *