Wed. Aug 10th, 2022

ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्सने पंतप्रधान सहायता निधीला देणगी देण्याचा निर्णय बदलला

वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने पंतप्रधान सहायता निधीला देणगी देण्याचा निर्णय बदलला आहे. त्याऐवजी कमिन्स हा निधी युनिसेफ ऑस्ट्रेलियाला देणार असल्याचं समोर येत आहे. या निधीद्वारे भारतातील कोरोनाग्रस्तांची मदत केली जाईल. याआधी कमिन्सने २६ एप्रिलला ५० हजार डॉलर्सची म्हणजे जवळपास ३७ लाख रुपये देणगी पंतप्रधान सहायता निधीला देत असल्याचं सांगितलं जात होतं. ऑस्ट्रेलियन क्रिकेट नियामक मंडळानेही भारताला कोरोना संकटाच्या काळामध्ये मदत करण्यासाठी हात पुढे केला आहे. तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलिया, क्रिकेटर्स असोसिएशन आणि युनिसेफ ऑस्ट्रेलियाने एकत्र येऊन भारतासाठी ५० हजार अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर केली. कोरोनामुळे भारताची परिस्थिती सध्याच्या घडीला चिंताजनक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सुरु असणाऱ्या घडामोडींमुळे आम्हाला खूप दु:ख होत आहे. भारतासोबत चांगले मैत्रीपूर्ण संबंध असणारा ऑस्ट्रेलिया या संकटकाळात भारतासोबत आहे, असे या संस्थांनी स्पष्ट केले आहे. युनिसेफ ऑस्ट्रेलिया हे भारतामधील ऑक्सिजनच्या तुटवड्यासंदर्भात काम करणार असून ऑक्सिजन निर्माण करणारी यंत्रणा भारतीय रुग्णालयांमध्ये उभारण्यासाठी सहकार्य करणार आहे. तसेच कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या जिल्ह्यांमधील चाचण्या वाढवण्यासाठी चाचण्यासंदर्भातील साहित्य लसीकरणासाठी आवश्यक असणारे साहित्य युनिसेफ ऑस्ट्रेलियाकडून पुरवले जाणार आहे. तसेच पॅट कमिन्सच्या मदतीनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट लीनेही भारतीयांसाठी मदतीचा हात पुढे केला. ब्रेट लीने ऑक्सिजन पुरवठ्यासाठी सुमारे ४२ लाख रुपयांची देणगी जाहीर केली. कमिन्सने या कठीण काळात भारताला मदत करण्याची विनंती त्याच्या सहकाऱ्यांना केली होती. त्यानंतर ब्रेट लीने

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.