Tue. Oct 26th, 2021

के. एल. राहुल आणि अथिया शेट्टीच्या नात्यात दुरावा आलाच्या चर्चांना उधाण

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी भारतीय क्रिकेटपटू डेट केलं आहे. बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील बऱ्याच जोड्यांनी लग्नही केले आहे. यात विराट-अनुष्का, जहीर खान-सागरिका घाडगे आणि हार्दिक पांड्या नताशा स्टानकोविच यांचा समावेश आहे. अशीच एक जोडी आता चर्चेत आली आहे. ती म्हणजे अथिया शेट्टी व क्रिकेटर के. एल. राहुल यांची गेल्या बऱ्याच काळापासून अथिया आणि के. एल राहुल एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात . त्यांचे फोटो चर्चेचा विषय देखील ठरतात. पण आता त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

के. एल. राहुलच्या आयुष्यात एका नव्या अभिनेत्रीची एण्ट्री झाल्याची चर्चा ही सोशल मीडियावर रंगत आहेत. के. एल. राहुलने पंजाबी मॉडेल आणि अभिनेत्री सोनम बजवाच्या फोटोवर कमेंट केल्यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे. त्याची कमेंट पाहिल्यावर अनेकांनी त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न विचारले आहेत. सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत तिने ‘सूर्य मावळत आहे आणि मी तुझ्याबद्दल विचार करत आहे’ असे कॅप्शन दिले होतं. के. एल. राहुलने तिच्या या फोटोवर कमेंट करत ‘बस एक कॉल दूर हू’ असे लिहिले होते. सध्या सोनमची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. के. एल. राहुलची कमेंट पाहून आथिया आणि के. एल. राहुल यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *