Mon. Jul 22nd, 2019

काय आहेत OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro चं वैशिष्ट्यं?

0Shares

मोबाईलच्या क्षेत्रात OnePlus या स्मार्टफोनचा चांगलाच बोलबाला आहे. याच OnePlus च्या OnePlus 7 सीरिजमधील मोबाईल फोन्स मंगळवारी लाँच करण्यात आले. या OnePlus 7 सीरिजच्या फोनबद्दल लोकांमध्ये खूप उत्सुकता होती. ‘गो बियॉण्ड द स्पीड’ अशी टॅगलाईन असणाऱ्या OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro या फोन्सची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू आहे.

काय आहेत OnePlus 7 ची वैशिष्ट्यं?

OnePlus 7 आणि OnePlus 7 Pro असे दोन स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले आहेत.

OnePlus 7 फोनची किंमत 32,999 रुपये किंमतीपासून सुरू होतेय.

या किंमतीच्या फोनमध्ये 6 GB RAM मिळेल. तर 8 GB RAM असणाऱ्या फोनची किंमत 37,999 असेल.

 

काय आहेत OnePlus 7 Pro ची वैशिष्ट्यं?

OnePlus 7 Pro 6 GB, 8 GB तसंच 12 GB RAM मध्ये उपलब्ध आहे.

या फोनची किंमत 48,999 ते 57,999 रुपयांपर्यंत आहे.

OnePlus 7 Pro चा डिसप्ले 6.67 इंच आहे.

विशेष म्हणजे या फोनला ट्रीपल लेन्स रिअर कॅमेरे आहेत.

48MP+16MP+8MP अशा प्रमाणांमध्ये असणाऱ्या कॅमेऱ्यांमधून उत्तम क्वालिटीचे फोटो काढता येणं शक्य होईल.

या फोनला 4,000 mAh इतकी बॅटरी देण्यात आली आहे.

या फोनला Dual Stereo Speaker देण्यात आले आहे.

तसंच Haptic vibration motor या फोनला आहे.

डॉल्बीमुळे या मोबाईलमध्ये गाणी ऐकणं हा भन्नाट अनुभव ठरणार आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: