Wed. Jan 26th, 2022

काय आहे जिनिव्हा करार ? जाणून घ्या

पाकिस्तानच्या ताब्यात भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना सुरक्षित भारतात पाठवावे अशी मागणी पाकिस्तानकडे करण्यात आली आहे. तसेच वैमानिकाला ताब्यात घेतल्याबद्दल भारताने पाकिस्तानवर नाराजी व्यक्त केली आहे. वैमानिकाला ताब्यात घेऊन पाकिस्तानने जिनिव्हा कराराचे उल्लंघन केले असल्याचे म्हटलं आहे. वैमानिकाला कुठल्याही प्रकारची इजा होता काम नये तसेच पाकिस्तानने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओबद्दलही भारताने नाराजी व्यक्त केली आहे.वैमानिकाला कोणत्याही प्रकारची इजा होता काम नये असे परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी केले.

काय आहे जिनिव्हा करार ?

युद्धकैद्याला मानवतेची वागणूक द्यावी

जखमी सैनिकांना आवश्यक आणि योग्य उपचार द्यावेत

युद्धबंदी सैनिकासोबत कुठलाही प्रकारचा भेदभाव करू नये

सैनिकांना जेवण आणि इतर आवश्यक सुविधा द्याव्यात

युद्धबंदीला कोणत्याही प्रकारची अमानवीय वागणूक देण्यास बंदी

युद्धबंद्याला धमकी देणे, मारहाण करणे, शारीरिक छळ करण्यास मनाई

युद्धबंदीची जात, धर्म, जन्मासंदर्भात चौकशी करू नये

युद्धबंदीला केवळ त्याचं नाव, हुद्दा, बॅच नंबर, युनिट एवढीच माहिती विचारण्याचा अधिकार

जखमी सैनिकाचे फोटो, व्हिडीओ प्रसारित करण्यास मनाई

युद्धबंदीवर खटला चालवू शकतात, मात्र युद्ध संपल्यावर त्याला त्याच्या देशाच्या ताब्यात द्यावं

सर्व देशांना या संधीचं पालन करणं बंधनकारक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *