Sun. Jun 20th, 2021

कोहिनूर मिल प्रकरणी, राज ठाकरेंनंतर नितीन सरदेसाईंची ‘ED’ कडून चौकशी

याच प्रकरणात ईडीने मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले.

कोहिनूर प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे  आणि माजी मुख्यमंत्री उन्मेष जोशी यांना ईडीने चौकशीसाठी बोलवले होते. त्यानंतर मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांना  गुरुवारी दुपारी ईडीच्या चौकशीसाठी कार्यलयात हजर व्हायचे होते. त्याची चौकशी करण्यात येत आहे.

 नितीन सरदेसाई यांचीही चौकशी

कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून चौकशी चालू आहे. ईडीकडून सरकारी क्षेत्रातील कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियर सर्व्हिसेसद्वारे (ILFS) मुंबईतील कोहिनूर सीटीएनएल कंपनीला दिलेल्या 860 रुपयांचे कर्ज आणि गुंतवणूक प्रकरणात चौकशी सुरु आहे.  मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशीच्या मालकीची ‘कोहिनूर सीटीएनएल’ दादरमधील सेना भवन समोरील ‘कोहीनूर स्क्वेअर’ हा जुळ्या टॉवर्सचा प्रकल्प उभारत होता.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उन्मेष जोशी आणि राजेंद्र शिरोडकर यांनी दादर येथील कोहिनूर मिलची जागा खरेदी केली. यासाठी 860 कोटी रुपयांचे कर्ज ILFS कडून घेतले होते.  पंरतु यात आयएलएफएसचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनतर त्यांनी कंपनीतील आपले शेअर्स विकले. आयएलएफएस कडून शेअर्स विकण्यात आल्यानंतर लगेचचं 2008 मध्ये राज ठाकरे यांनी आपले शेअर्स सर्व विकले. पंरतु त्यानंतरही राज ठाकरे यांचा कंपनीत सक्रिय सहभाग असल्याच्या आरोपावरुन ईडीकडून त्यांची चौकशी सुरु आहे. याच प्रकरणात ईडीने मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *