Mon. May 10th, 2021

राज्यातील बळीराजाला दिलासा, मान्सूनचं दमदार आगमन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. सर्वत्र आल्हाददायक वातावरण पाहायला मिळत आहे. संततधार पावसामुळे नागरिकांची उन्हाच्या काहिलीतून सुटका झाली आहे.

 

वेगवान वाटचाल करत मान्सून राज्यात दाखल झाला असतानाच मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारसह शुक्रवारी पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी मुंबईकरांना सुखद दिलासा दिला आहे.

 

रात्रभर कोसळलेल्या दमदार पावसामुळे मुंबापुरीत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, मान्सून आगेकूच करत असतानाच शनिवारसह रविवारी मुंबापुरीत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

 

मागील 24 तासांत कोकण, गोवा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मान्सून वेगाने पुढे सरकत असतानाच मुंबईतही पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *