Wed. Jun 26th, 2019

राजकीय वादातून तुंबळ हाणामारी, 8 जण गंभीर जखमी

0Shares

कोल्हापुरातल्या शाहूवाडी गेळवडे गावात राजकीय वादातून 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. सीताराम लाड आणि बारकू लाड या 2 गटात ही हाणामारी झाली असून तलवारी आणि कोयत्याने एकमेकांवर वार करण्यात आले या हाणामारीत तलवारी आणि काठ्यांनी एकमेकांवर वार करत असताना यात एका व्यक्तीचा हात तुटला आहे.

तलवारीच्या घावात सिताराम लाड यांना आपला उजवा हात गमवावा लागला आहे. तसेच या हाणामारीत आणखी 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही हाणामारी राजकीय वादातून झाल्याची माहिती मिळत आहे.

हाणामारीत जखमी झालेल्या व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: