कोल्हापुरमध्ये सापडल्या स्फोटकांंच्या पदार्थांनी भरलेल्या चार पिशव्या

कोल्हापुरात शनिवारी सकाळी अज्ञात वस्तूचा स्फोट होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दरम्यान स्फोट झालेल्या परिसरात आणखी काही स्फोटकांच्या पदार्थांनी भरलेल्या चार पिशव्या सापडल्याची खळबळजनक माहीती समोर आली आहे.

अमोनिया नायट्रेट,सल्फर,सिंटेक्स असे ज्वालाग्राही पदार्थ या  पिशव्यांत आढळले आहेत. दहशतवादी विरोधी पथक,बॉम्ब शोधक पथक,स्थानिक गुन्हे शाखा,फॉरेन्सिक लॅबकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला असून यात एका व्यक्तीच्या हातात ज्या बॅग आहेत त्यात ज्वालाग्राही पदार्थ असल्याचे दिसून आले आहे.

या स्फोटाच्या कारणांचा अद्याप शोध लावण्यात यंत्रणांना अपयश आले आहे.  उड्डाणपूल परिसराचा  पोलिसांकडून कसून तपास सुरू असून गोवा,कर्नाटक राज्यात तपासासाठी पथके रवाना केली असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Exit mobile version