कोल्हापुरकरांची चिकन फेस्टिव्हलला मोठी गर्दी

कोल्हापुरकरांसाठी चिकन-मटण म्हणजे जीव की प्राण. कोल्हापुरमध्ये शुक्रवारी चिकन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या काही दिवंसापासून चिकनमुळे कोरोना व्हायरसची लागण होते, अशी अफवा समाजमाध्यांवर पसरत होती.
लोकांमध्ये कोरोना व्हायरलबद्दल असलेला भ्रम दुर करण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले होते.
विशेष म्हणजे या महोत्सवात अवघ्या 50 रुपयात चिकन बिर्याणी, चिकन 65 यासारखे पदार्थ होते. यामुळे खव्य्यांनी चांगलाच ताव मारला.
स्वस्त दरात बिर्याणी मिळत असल्याने खव्य्यांनी एकच गर्दी केली. यामुळे ही गर्दी आवाक्याबाहेर गेली. त्यामुळे एकच गदारोळ निर्माण झाला.
यामुळे आयोजकांची तारांबळ उडाली. या महोत्सवा दरम्यान चक्क प्लेट फेकाफेकी करण्यात आली.
गोंधळाची परिस्थिती निर्माण झालीय यामुळे पोलिसांना घटनास्थळी धाव घ्यावी लागली.